सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु

सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाली. या स्पर्धेत ३८ संघ सहभागी होत आहेत. उद्घाटनाचा सामना मिझोराम आणि नागालँड यांच्यात पुण्याच्या डेक्कन जिमखाना मैदानावर होत आहे. स्पर्धेतला अंतिम सामना १८ डिसेंबरला इंदूरमध्ये होईल. गतविजेत्या मुंबई संघाचं कर्णधारपद यावेळी शार्दूल ठाकूरकडे सोपवण्यात आलं आहे.