January 2, 2026 10:15 AM | switzerland

printer

स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू

स्वित्झर्लंडमध्ये, नववर्षाच्या पूर्वसंध्येला वालिस कॅन्टनमधील एका रिसॉर्टमधील ले कॉन्स्टेलेशन मद्यालयामध्ये झालेल्या स्फोट आणि आगी

3च्या घटनेमध्ये चाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि 115 जण जखमी झाले.

 

स्थानिक पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात असून, दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आपले नववर्षाचे भाषण पुढे ढकलले आहे.