डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभर तयारी सुरु

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आला असून देशात आणि देशाबाहेरही त्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केली असून संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. या अभियानाला आता लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं असून यामुळे देशात एकतेचा संदेश जात असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

 

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू भागात, विशेषतः पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मूच्या सर्व १० जिल्ह्यांमध्ये हर घर तिरंगा अभियानासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. 

 

७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाची तयारीही सर्वत्र सुरू आहे. पुदुचेरीच्या बीच रोडवर या संचलनाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. 

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रानं श्रीलंकेत कोलंबो इथं सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आणि व्हायोलिनवादक एल. सुब्रमण्यम यांचं सादरीकरण होईल.