October 4, 2025 1:28 PM | swastha nari

printer

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. देशभरात सुमारे १८ लाख आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे.

 

१७ सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली होती. २ ऑक्टोबरला या अभियानाची सांगता झाली. हे अभियान महिलांचं आरोग्य आणि सशक्त, समृद्ध कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या देशाच्या सामूहिक संकल्पाचं प्रतीक असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.