डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उद्यापासून सुरूवात

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरूवात होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरूवात होणार आहे. तसंच मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून, सर्व महिला आणि बालकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.