‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन

केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत देशभरात आतापर्यंत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या आरोग्य परिषदेत बोलत होते.  या शिबिरांमार्फत ३ कोटी ६० लाखांहून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हा आकडा चार कोटींपेक्षा जास्त वाढेल, अशी अपेक्षा नड्डा यांनी यावेळी व्यक्त केली.