स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशभरातून आदरांजली

स्वामी विवेकानंद यांच्या  जयंतीदिनी आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. विवेकनंदांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.  

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतीय संस्कृतीने दिलेलं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोचवण्याचं महत्वाचं काम स्वामीजींनी केलं असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण केलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवन आणि शिकवणीतून स्वयंशिस्त, निस्वार्थ सेवाभाव आणि अंतर्मनाची शक्ती वाढवण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळत आहे, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामीजींच्या चरित्रातून देशवासियांना आणि विशेषतः तरुणांना नवीन शक्ती आणि आत्मविश्वासाची प्रेरणा मिळेल असं आपल्या  संदेशात म्हटलं आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर मान्यवरांनीही स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहिली आहे.  

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचीही जयंती आज देशभरात साजरी होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.