आकाशवाणी भवन इथं राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी घेतली स्वच्छता प्रतिज्ञा

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. ‘स्वछता हीच  सेवा’ या अभियानाच्या पाचव्या भागातल्या विशेष मोहिमे अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांच्या उपक्रमांची माहिती मुरुगन यांनी आकाशवाणी भवनाच्या बापू स्टुडिओला दिलेल्या भेटीदरम्यान दिली. या मोहिमेमुळे कार्यक्षेत्रांच्या स्वच्छतेचं रेकॉर्ड ठेवणं, व्यवस्थापन करणं, कचऱ्याची प्रतवारी करणं शक्य झालं आहे, असंही त्यांनी  यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.