September 25, 2025 2:53 PM | Swachhta Hi Seva

printer

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा

‘स्वच्छता ही सेवा’ या सध्या सुरु असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं.  भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आज दिल्लीतल्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आज राजधानी दिल्लीत कालिंदी कुंज घाट इथं स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. 

 

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज ठिकठिकाणी एक दिवस  एक तास एकसाथ उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात आली. 

 

आकाशवाणी मुंबईच्या प्रसारण भवनात झालेल्या स्वच्छता अभियानात कार्यालय प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.