वाशीम जिल्ह्यात स्वछता अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

स्वछता अभियान २०२४ अंतर्गत वाशीम जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळाने अयोध्येत श्री रामजन्मभूमी इथे शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात ५१ महिलांनी सहभाग घेतला. तसंच, जिल्ह्यातल्या कामरगाव इथे आज क्लीन इंडिया मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला. हा कार्यक्रम वाशीम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आला होता.