स्वच्छता ही सेवा या अभियानाला परवापासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती शहर कल्याण मंत्री मनोहर लाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्यांचीह त्यांनी सांगितलं. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशव्यापी एक दिवस, एकसाथ, एक तास श्रमदान कार्यक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | September 15, 2025 8:33 PM | Swachhotsav
देशभरात १७ सप्टेंबरपासून स्वच्छतोत्सव साजरा होणार
