September 16, 2025 3:59 PM | Swachhata Hi Seva

printer

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला उद्यापासून सुरुवात

स्वच्छताही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरं होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी एक दिवस, एक साथ, एक तास श्रमदान हा देशव्यापी कार्यक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.