डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि कराड शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

स्वच्छता ही भारतीयांच्या स्वभाव आणि संस्कारांचा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ९व्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी उपक्रम ठरला आहे. 

 

स्वच्छ भारत मिशन – शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत यावर्षी सुपर स्वच्छ लीग शहरं आणि लोकसंख्येच्या आधारे पाच श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

 

यामध्ये, इंदूरने सलग आठव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपला किताब कायम ठेवला. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच लोकसंख्येच्या आधारे विभागण्यात आलेल्या ५ श्रेणींमध्ये महाराष्ट्रातल्या मीरा- भाईंदर, कराड शहरांना सुपर स्वच्छ शहर पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमादरम्यान, विविध श्रेणींमध्ये एकूण ७८ पुरस्कार प्रदान करण्यात आले.