मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातली संशयित शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या कंपनीला पुण्याच्या मुंढवा भागातली ही जमीन ३०० कोटी रुपयांना विकण्यासंदर्भातल्या व्यवहाराशी शीतल तेजवानी यांचा संबंध आहे. ही ४० एकर जमीन सरकारच्या मालकीची असून वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाला भाड्याने दिलेली होती. या प्रकरणात पार्थ पवार संशयित नसले, तरी विक्रीपत्रावर त्यांचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
Site Admin | December 3, 2025 5:43 PM
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातली संशयित शीतल तेजवानीला अटक