अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बंद केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं दोन वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले. एका तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं पाटणा इथं विशेष न्यायालयात दाखल केला. दुसरी तक्रार अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनं सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबईत दाखल केली होती. त्याचा क्लोजर रिपोर्ट मुंबईत विशेष न्यायालयात सादर करण्यात आला.