काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांचं आज नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरंपचपदापासून नाईक यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९७८ पासून त्यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघाचं अनेकवेळा प्रतिनिधित्व केलं. तसंच समाजकल्याण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, वन आणि बंदरे आदी खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.