तामिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांना UNEP, अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम २०२५ चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया साहू, या पर्यावरण विषयक अत्यंत गंभीर मुद्द्यांवर काम करणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. आपल्या कामाप्रति असलेली त्यांची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कृती, यासाठी UNEP नं या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
एकात्मिक प्रशासन आणि निसर्गावर आधारित उपायांचा अल्प आणि उच्च स्तरावरच्या तंत्रज्ञान आधारित उपायांशी मेळ घालून, कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबर, असुरक्षित समुदायांचं रक्षण कसं करता येईल, हे सिद्ध करण्यासाठी साहू यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.