वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादीयाला अटकेपासून संरक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने यूट्युबर रणवीर अलाहबादीयाला वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. रणवीर विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रणवीरच्या टिपण्ण्यांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. तसंच त्याला आपलं पारपत्र पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगी शिवाय  देश न सोडण्याचे निर्देश खंडपिठानं दिले आहेत.