निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने घेतला आहे. या संदर्भात गेल्या गुरुवारी आणि आज अशा दोन बैठका झाल्या.
१४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेली आग आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळली, त्याप्रकरणी सरन्यायाधीशांच्या आदेशानुसार चौकशीसाठी त्रिसदस्यीय अंतर्गत समिती नेमण्यात आली होती. तसंच वर्मा यांच्याकडून कामकाज काढून घेण्यात आलं होतं. वर्मा यांची मूळ नेमणूक अलाहाबाद उच्च न्यायालयात झाली होती. तिथेच त्यांना आता परत पाठवण्यात येत आहे.