दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी महिन्यातून दोनदा सुनावणी

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणाचा मुद्दा हा दर हिवाळ्यात न्यायालयात आणायचा मुद्दा नसून यावरचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी यावर महिन्यातून दोनदा सुनावणी घेतली जाईल, असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. कोरोनाच्या काळातही शेतातला कचरा जाळला जात होता, पण तरीही आकाश निरभ्र दिसत होतं. त्यामुळे, या प्रदूषणामागे इतरही काही कारणं असू शकतात, असं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.