आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी निर्णय घेणार आहे. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे.