सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी यूजी)२०२५ च्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. एका प्रश्नासाठी अनेक योग्य उत्तरे असू शकतात, राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेच्या अंतिम उत्तरांत या टप्प्यावर हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायाधीश पी. एस. नरसिंहा आणि आर. महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे. एनईईटी यूजी २०२५चा अंतिम निकाल चुकीचा आणि मनमानी असल्याच्या विरोधात न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत.
Site Admin | July 4, 2025 7:56 PM | NEET UG 2025 | Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचा एनईईटी यूजीच्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार
