डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वृत्तसंस्थेच्या बातमीत व्यक्त केली आहे. 

मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गांतर्गत शिक्षण आणि नोकरीमधे दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी मराठा समाज समन्वयक विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर अंतिम सुनावणी निश्चित केली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.