डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे.

यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. मदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.