सर्वोच्च न्यायालयात गोध्रा रेल्वे जळितकांडाची अंतिम सुनावणी येत्या ६ आणि ७ मे रोजी होणार आहे. २००२ साली गुजरातमधे गोधरा इथं साबरमती एक्सप्रेसला आग लावल्याप्रकरणी गुजरात सरकारने तसंच इतर काही दोषींनी दाखल केलेल्या याचिकाची एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या पीठासमोर होईल. संबंधित याचिकाकर्त्यांनी सुधारित अर्ज येत्या ३ मे पर्यंत दाखल करावेत असं न्यायालयाने त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सांगितलं.
२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी साबरमती एक्सप्रेसला लावण्यात आलेल्या आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातले बहुसंख्य अयोध्येहून परतणारे कारसेवक होते.