भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय ७ नोव्हेंबरला निर्णय देणार आहे. बहुसंख्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सुनावणीला उपस्थित होते, असं न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन व्ही अंजारीया यांच्या विशेष पीठानं सांगितलं. त्याआधी न्याायलयाने पश्चिम बंगाल आणि तेलंगणाशिवाय सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहायचे निर्देश दिले होते. या राज्यांनी अनुपालन शपथपत्रं सादर का केली नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली. यावर सर्व राज्यांनी अनुपालन शपथपत्र सादर केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. या प्रकरणात न्यायालयाने प्राणी कल्याण मंडळालाही प्रतिवादी केलं आहे.
Site Admin | November 3, 2025 1:37 PM | Dog | Supreme Court
सर्वोच्च न्यायालात भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सुनावणी