लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा-सर्वोच्च न्यायालयानं

लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी केवळ डाउनलोड करणे आणि पाहणे हा पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नसल्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत, सरन्यायाधीश डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील, खंडपीठानं हा निकाल दिला. यासोबतच संसदेला ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ या शब्दाच्या जागी, ‘चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लो-इनटेटिव्ह अँड अब्यूज मटेरियल’ अशी संज्ञा वापरण्याची सूचना देखील, सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.