पश्चिम बंगाल सरकार आणि ईडीनं कोलकात्यातल्या आय-पॅकच्या धाड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक सल्लागार संस्था आय-पॅकच्या कोलकात्यातल्या कार्यालयावर ईडीनं गुरुवारी छापे टाकले होते. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याठिकाणी प्रवेश करुन छाप्यांना विरोध केला होता. त्यानंतर ईडीनं कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेऊन बॅनर्जी यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
Site Admin | January 10, 2026 8:02 PM
कोलकात्यातल्या आय-पॅकच्या धाड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव