मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं सुलभ होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना नियम डावलून केल्याचे पुरावे नाहीत, जोपर्यंत या निर्णयात कायद्याचं उल्लंघन दिसून येत नाही तोपर्यंत न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
Site Admin | December 18, 2025 6:56 PM | Supreme Court
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली