September 2, 2024 8:20 PM | Supreme Court

printer

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरणासाठी समिती स्थापन

सर्वोच्च न्यायालयानं शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरण करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज एक समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवडाभरात पहिली बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करू नये, समितीने टप्प्याटप्प्याने त्यावर विचार करावा,  पर्यायी ठिकाणी शेतकरी शांततापूर्ण आंदोलने करू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं  आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.