राजकीय भांडणांसाठी ईडी स्वतःचा वापर का करु देते, असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी ईडीची याचिका आज फेटाळली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एका प्रकरणात ईडीनं बजावलेलं समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. याला आव्हान देणाऱ्या, ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रातल्या घटनांचं उदाहरण देत ही टिप्पणी केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ईडीची याचिका फेटाळण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं आहे.