बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई द्यायला बांधील नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्या कुटुंबाने गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याचा दावा केला होता आणि विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र, पोलिसांच्या आरोपपत्रात कुटुंबाच्या प्रमुखानेच बेफिकीरपणे गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं होतं.
Site Admin | July 3, 2025 8:51 PM | Supreme Court
बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला वीमा कंपनी बांधिल नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
