भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधल्या आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती नासानं आज दिली. सुनिता विल्यम्स यांनी आपल्या सेवाकाळात ३ अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेत अंतराळात ६०८ दिवस काढले आहेत. याचबरोबर त्यांनी ९ वेळा मिळून ६२ तासाचं स्पेसवॉकही केलं आहे. अंतराळ क्षेत्रातल्या महिलांचा हा एक विक्रम आहे.
Site Admin | January 21, 2026 1:51 PM | NASA | Sunita Williams
अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची सेवानिवृत्तीची घोषणा