आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिन्यांहून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील, अशी माहिती नासाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर, यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानाद्वारे भुतलावर आणण्यात येईल. अमेरिकन अवकाश संस्था नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील ड्रॅगन कॅप्सूलवर परततील. आठ दिवसाच्या अभियानासाठी गेलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळांत अडकून पडले आहेत.
Site Admin | March 17, 2025 10:14 AM | Butch Wilmore | NASA | Sunita Williams
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार !
