डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात झाली. लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या दौऱ्याची व्यापकता वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली  करायचा आहे. यापुढं सर्वांनी जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं, असं आवाहन त्यांनी अहमदनगरमधल्या आढावा बैठकीत केलं. विरोधकांनी पसरवलेले गैरसमज कसे चुकीचे आहेत ते लोकांना सांगायची गरज आहे असं ते म्हणाले. 

लोकसभेत आलेले अपयश विसरुन, झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यश पायरी नक्की मिळवू, असा विश्वास पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.