डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते. 

प्रफुल्ल पटेल यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बुधवारी रात्री त्यांच्या नावावर सहमती झाली, त्यांच्या उमेदवारीवरुन कुणीही नाराज नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.    

दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.