डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशभरात पंचविसाव्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढली जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व करतील. ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की, ३ जूनला होणाऱ्या जागतिक सायकल दिनामुळे, आजचा कार्यक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सायकलिंगच्या मोठ्या भूमिकेचा संदेशच नाही तर भारताच्या सशस्त्र दलांसाठी सामूहिक आदरांजली म्हणूनही महत्वाचा आहे. देशभरातल्या दोन हजारांहून अधिक ठिकाणी आज सायकल दिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा