डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सुमितनं पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्कीचा ६-४, ७-५ असा पराभव केला. सहाव्या मानांकित सुमित नागलनं उत्कृष्ठ खेळी करत १० दिवसांत सलग आठवा सामना जिंकला आहे.

आज उपांत्य फेरीत त्याची लढत स्पेनच्या बर्नाबे जपाता मिरालेसशी होणार आहे. फ्रेंच ओपन आणि हेल्ब्रॉन चॅलेंजरमधल्या सुरेख कामगिरीनंतर नागलनं जागतिक क्रमवारीत ७७व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्या एकेरीच्या क्रमवारीच्या आधारे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.