November 16, 2024 8:02 PM | Sukhbir Singh Badal

printer

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दुपारी पक्षाच्या कार्यकारिणीकडे राजीनामा दिला. पक्ष प्रवक्ता दलजीत सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.