ऊसाच्या एफआरपीसोबत साखरेची एमएसपी जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं.
मुंबईमध्ये नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातील विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेची माहिती देताना ते म्हणाले की ऊसाची एफआरपीची रक्कम गेल्या 6 वर्षापासून वाढत्या उत्पादन खर्चामुळं प्रति टन सुमारे 650 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ करण्यासाठी एफआरपी आणि एमएसपी यांनाA जोडणं आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असं मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.