राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातल्या ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. येत्या १० दिवसात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या धर्तीवर जी सवलत दिली जाते ती सर्व सवलत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पंचनामा पूर्ण झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना सव्वा २ हजार कोटी रुपयांची मदत आतापर्यंत दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषीविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी १ दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देणार आहेत. यातून ६ कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होईल, असं ते म्हणाले.