August 26, 2025 1:34 PM

printer

सुदर्शन चक्र हा प्रकल्प भारताचा संरक्षक पोलादी कवच असल्याचा संरक्षण दल प्रमुखांचा विश्वास

सुदर्शन चक्र हा प्रकल्प हे भारताचा संरक्षक पोलादी कवच असून ते देशाच्या धोरणात्मक, नागरी आणि राष्ट्रीय महत्वाच्या ठिकाणांचं रक्षण करेल असं प्रतिपादन  संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलं. मध्यप्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित दोन दिवसीय रण संवाद-२०२५ ला ते आज संबोधित करत होते. 

 

संरक्षण सुविधांचा विकास आणि शत्रुच्या हालचालींचा मागोवा आणि त्या निष्प्रभ करणे या गोष्टींचाही यात अंतर्भाव असेल असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता तसंच कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर आणि क्वांंटम तंत्रज्ञान यांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.