दक्षिण सुदानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे २६ तालुक्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसहा लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयने दिली आहे.
मुसळधार पावसामुळे सुमारे पावणेदोन लाख लोक विस्थापित झाले आहेत, पुरामुळे मलेरिया, अतिसार आणि श्वसन संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. किमान १२१ आरोग्य सुविधांवर परिणाम झाला आहे आणि कुपोषणाची तीन हजारांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
सेव्ह द चिल्ड्रनने इशारा दिला आहे की यावर्षी 14 लाख लोक पुरामुळे प्रभावित होऊ शकतात. कारण नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मदत कपातीमुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला आहे, तर जवळजवळ ८ दशलक्ष लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे आणि पाच वर्षाखालील २० लाखांहून अधिक मुलांना तीव्र कुपोषणाचा धोका आहे.