डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय लष्करासाठी निर्माण केलेल्या ‘झोरावर’ रणगाड्याची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ने भारतीय लष्करासाठी निर्माण केलेल्या ‘झोरावर’ या हलक्या वजनाच्या रणगाड्याची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. हा रणगाडा अति उंच प्रदेश तसंच वाळवंटी भागात उपयुक्त आहे. हा रणगाडा बनवण्यात देशांतील सूक्ष्म, लघु तसंच मध्यम उद्योगांसाहित अनेक आस्थापनांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.