जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर ८ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं काल जम्मू काश्मिरमधल्या जगातील सर्वात उंचीवरच्या चिनाब पुलावर आठ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मिरमधील राईसी ते बारामुल्ला दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामबान जिल्ह्यातल्या संगलदान पासून ते रईसी दरम्यान ४६ किलोमिटर विद्युतीकरण झालेल्या मार्गावर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. या मार्गावरुन ४० किलोमिटर प्रतीतास वेगानं गाडी चालवण्यात आली. या पुलावरुन पहिल्यांदाच पूर्ण रेल्वेगाडी चालवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.