अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक तळावरून ही यशस्वी चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांच्या सामरिक प्रतिकार क्षमता दाखवून दिली. या दोन्ही क्षेपणास्त्रांची कार्यचालन आणि तांत्रिक घटकांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून पाचशे किलोपर्यंत आण्विक शस्त्रास्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. तर अग्नि-1 क्षेपणास्त्राचा पल्ला 700 ते 900 किलोमीटर आहे. ते एक हजार किलोग्रॅम भार वाहण्यास सक्षम आहे. देशानं बुधवारी आकाश प्राईम या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र साडेचार हजार मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवरील लक्ष्याचाही भेद घेण्यास सक्षम आहे.
Site Admin | July 18, 2025 11:07 AM | Agni 1 Missile | Prithvi 2 Missile
पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारताकडून यशस्वी चाचणी