यंदा प्रत्यक्ष कर संकलनात भरीव वाढ

चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलनात २२ पूर्णांक १९ शतांश टक्के, तर निव्वळ कर संकलनात सुमारे २१ टक्क्याची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत सुमारे ५ लाख १५ हजार कोटी रुपयांहून अधिक एकूण प्रत्यक्ष कर तर सुमारे ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कर गोळा झाला असल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलं आहे.