केंद्रसरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमधे वायनाड इथं २०२४ मधे भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्याने बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या अहिल्यानगरच्या सीता शेळके भारतीय सैन्याच्या मद्रास अभियांत्रिकी आस्थापनेत कार्यरत आहेत. ५ लाख रुपये आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. संस्थांसाठीचा ५१ लाख रुपयांचा पुरस्कार यंदा सिक्किम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
Site Admin | January 23, 2026 12:51 PM | Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar
सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्कार जाहीर