डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 3, 2024 7:31 PM | School | Student

printer

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संविधानातून सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळते. विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या या मंदिरांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीचं पूजन होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.