January 7, 2025 10:50 AM | भूकंप

printer

दिल्ली, नोएडासह देशाच्या उत्तर भागात आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

देशात बिहार, दिल्ली नोएडा, आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप जाणवला. नेपाळमधील लोबुचे पासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये या भूकंपाची 7 पूर्णांक 1 रिखटर एवढी तीव्रता नोंदवली गेली. याबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.